पेण (प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी *जिल्हास्तरावर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन* करण्यात आले. त्यानुसार *रायगड जिल्हा परिषद, अलिबाग समाज कल्याण विभाग व सुहित जीवन ट्रस्ट, पेण* यांच्या संयुक्त विद्यमाने *शनिवार, दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी *जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे* आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे *यजमानपद व कार्यक्रमाचे आयोजन सुहित जीवन ट्रस्ट, पेण या संस्थेने केले*.
रायगड जिल्ह्यातील समस्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (गतिमंद, कर्णबधिर, बहुविकलांग, मूकबधिर, सेरेब्रल पाल्सी, ऑटिस्टिक इ. ) *जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे* आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमामुळे या विशेष विद्यार्थ्यांमधील *क्षमता व कौशल्यगुणांना वाव मिळून त्यांच्यामधील कलात्मकता वृद्धिंगत व्हावी* असा उद्देश होता व परिणामी सर्व संस्थातील विद्यार्थ्यांनी आनंदाने एकमेकांशी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी व विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. *या आगळ्यावेगळ्या समाजातील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे*.