"डॉक्टर्स प्रीमियर लीग २०२४" कळंबोली वॉरियर्स विजेते आणि तलोजा टायगर्स उप विजेते
पनवेल /प्रतिनिधी.
तलोजा डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने पनवेल परिसरातील डॉक्टरांसाठी" डॉक्टर्स प्रीमियर लीग २०२४" क्रिकेट सामन्याचे आयोजन दिनांक २७ जानेवारी २०२४ आणि २८ जानेवारी २०२४ असे दोन दिवस करण्यात आले होते. यामध्ये कळंबोली वॉरियर्स विजेते ठरले तर तलोजा टायगर्स उप विजेते ठरले. तिसऱ्या स्थानी करंजाडे लायन्स, आणि चौथ्या स्थानिक करंजाडे वॉरियर्स आले. सदर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सदर क्रिकेट कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य देवा मडवी आदींनी भेट देऊन खेळाडूंचे मनोधैर्य वाढवले.
सदर क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू अनिकेत भोईर, सर्वोत्कृष्ट फलंदाज सागर पाटील, तुषार कांबळे, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण अभिजीत भोईर, सर्वोत्कृष्ट एसटी रक्षक मनोज कोपरकर, अशी निवड करण्यात आली. या क्रिकेट सामन्यांमध्ये तलोजा टायगर्स, टीडीडब्ल्यूए 11, करंजाडे वॉरियर्स, सिद्धी खारघर, खांदा कॉलनी सुपर किंग, करंजाडे लायन्स, खारघर वॉरियर्स, उलवे युनायटेड, कामोठे किंग्स, पनवेल वॉरियर्स, कर्नाळा वॉरियर्स , पीडीजीपी टायगर्स, खारघर फोनिक्स, कळंबोली वॉरियर्स, आणि पनवेल प्राइड्स या 15 संघाने भाग घेतला होता, सदर क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी तलोजा डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर संतोष जगे,उपाध्यक्ष डॉ. सतीश भोईर. सचिव डॉ. हेमंत सकपाळ, खजिनदार डॉ. राहुल भोईर आणि असोसिएशनच्या सर्व डॉक्टर सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन ह सामने यशस्वी केले.