देशाच्या संसदेत *SHE IS CHANGE MAKER*...
पंचायत से पार्लमेंट तक कार्यशाळेत पनवेल महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील व दर्शना भोईर यांचा सहभाग
नवी दील्ली,दि.९- राष्ट्रीय महिला आयोग व रामभाऊ महाळगी प्रबोधिनी,मुंबई यांच्या वतीने आयोजित देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत " *पंचायत से पार्लमेंट तक* " या स्थानिक स्वराज्य संस्थामधील महिलांसाठीच्या आयोजित कार्यशाळेत शुक्रवारी पनवेलमधून मा.नगरसेविका सौ.नेत्रा किरण पाटील आणि दर्शना भोईर यांना सहभागी होण्याची संधी मीळाली.पाचशेहुन अधिक महिला लोकप्रतिनिधी या कार्यशाळेत देशभरातून सहभागी झाल्या होत्या.महाराष्ट्रातून जवळपास 50 लोकप्रतिनिधी महिलांनी सहभाग नोंदवला.या कार्यशाळेत महिलांचे अधिकार यावर विस्तृत विचारमंथन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.लोकसभेचे स्पीकर श्रीयुत ओम बिर्लाजी,राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रेखा शर्मा, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री खासदार कपिल पाटील, खासदार मनोज तिवारी आदींचे मार्गदर्शन यावेळी लाभले.
सौ.नेत्रा किरण पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले की, माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानास्पद हा क्षण होता.स्थानिक पातळीवर काम करत असताना आपल्या कामाची घेतलेली दखल यामुळे आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात मला जाता आले याचा निश्चित एक वेगळा आनंद आहे.सोबतच देशाच्या राष्ट्रपती भवनला देखील शनिवारी भेट दिली,व ऐतिहासिक अश्या वास्तूचे दर्शन घडले.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री.विनोदजी तावडे यांच्या निवासस्थानी देखील आम्ही महाराष्ट्रातील सर्व महिला लोकप्रतिनिधींनी भेट दिली,यावेळी तावडे परिवाराने आमचा पाहुणचार केला,हे पाहून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना काय स्थान आहे याची देखील अनुभूती मला प्राप्त झाली.