पनवेल महापालिका आयुक्तांनी केले मेडिकवर हॉस्पिटल्सच्या विशेष आरोग्य कार्डचे अनावरण
नवी मुंबई : नवीन वर्षात अनेकांनी आपले निरोगी आरोग्याचा संकल्प केला आहे. निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठीच खारघर येथाल मेडिकवर हॉस्पिटल्स सवलतीच्या दरात आरोग्य चाचण्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. या आरोग्य कार्डचे अनावरण करताना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख सांगतात की, चाळीशीनंतर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या चाचण्यांमध्ये रक्तातील साखरेची पातळी, संपूर्ण रक्त तपासणी, मूत्र विश्लेषण, लिपिड प्रोफाइल, यकृत कार्य चाचणी, थायरॉईड उत्तेजक संप्रेरक (TSH), मॅमोग्राफी, पॅप स्मियर, छातीचा एक्स-रे, पल्मोनरी फंक्शन चाचणी यासारख्या 17 प्रमुख चाचण्या , ईसीजी आणि तज्ज्ञाच्या सल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले.
2023 मध्ये न्यूरोलॉजिकल, कार्डियाक, किडनी, यकृत, फुफ्फुस आणि थायरॉईड समस्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे बैठी जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी. आधुनिक जीवनातील दबावामुळे तणावाची पातळी वाढू शकते, याव्यतिरिक्त प्रदूषण आणि विषारी पदार्थांमुळे किडनी, यकृत, फुफ्फुस आणि थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढते आहे. वेळीच निदान व उपचाराने एखाद्याला गंभीर आजारांवर मात करता येणे शक्य होते अशी प्रतिक्रिया डॉ नवीन के.एन (महाव्यवस्थापक आणि केंद्र प्रमुख, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी स्पष्ट केले