पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्था नवीन पनवेल चा तृतीय वर्धापन दिन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
पनवेल दि ०६ (वार्ताहर) : नवीन पनवेल पंचशील नगर च्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचा तिसरा वर्धापन दिन निमित्त राकेश सपकाळ प्रस्तुत भीम गीतांचा कार्यकाराचे आयोजन केले होते. या वेळी महापुरुषाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला उद्घाटक पनवेलच्या प्रथम नागरिक माजी महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थिती माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रमुखपाहुणे डॉ सुभदा निल,हाय रिच पाणी कंपनी संचालक भावेश धणेशा, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे,समाजसेवक संजय ननावरे आरपीआय जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे,जेष्ठ पत्रकार संजय कदम, भीम योद्धा सुभाष गायकवाड ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील पत्रकार अण्णासाहेब आहेर पत्रकार अक्षय कांबळे समाजसेवक मुकुंद कांबळे पत्रकार राम बोरिले यांच्या उपस्थित करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोका आखाडे, सचिव राहुल पोपुलवार, सह सचिव विनोद खंडागळे, खजिनदार भानुदास वाघमारे, संघटक कैलास नेमाडे,कमिटी सदस्य विनोद तायडे अजय दुबे अमन तायडे मनोज ठाकूर दीपक लोंढे यांनी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण लोंढे उमेश पलमाटे, शैलेश खरात, आदित्य लोखंडे, अजय भट, शंकर खरात यांच्यासह अनेक नागरिकांनी मेहनत घेतली होती.