सानपाडा विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई


                                                              

सानपाडा विभागात विनापरवानगी बांधकामांवर तोडक कारवाई




 

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागा अंतर्गत श्रीमवनिता अशोक पाटीलघर क्र. 119/2, पिंपळपाडासे.05, सानपाडानवी मुंबईयांनी विनापरवानगी घर क्र. 119/2 पिंपळपाडासे.05, सानपाडायेथे सुमारे 9.40 मी.x 6.00 मीया मोजमापाचे G + 2 चे R.C.C. बांधकाम सुरु आहे.

      सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 53 1(अ) अन्वये देण्यात आलेली 24 तास मुदतीची नोटीस (कलम 52 च्या कलम 1 च्या खंड “अ” व “क” अन्वये ठरत असलेल्या अनधिकृत विकासकामाची नोटीस बजावण्यात आलेली होती.

तसेच सदर अनधिकृत बांधकाम यापुर्वी दि.12 जानेवारी 2023 रोजी निष्कासित करण्यात आलेले होते.याशिवास सदर अनधिकृत बांधकामावर गुन्हा क्र. 0172/2023, दि.28/10/2023 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.

परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच असल्याचे पुनश्च: निदर्शनास आले होतेसदर अनधिकृत बांधकामावर सिडको व डी विभाग तुर्भेनवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्फत संयुक्त तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन सदरचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे.     

सदर मोहिम मा. नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको श्री. वेणु नायर व मा. सहाय्यक आयुक्त, तुर्भे श्री. भरत धांडे, यांचे नियंत्रणाखाली सिडकोचे अधिकारी/कर्मचारी व तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे. ‍

तसेच सदर मोहिमेसाठी सिडको, अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि सिडको व मनपा अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते.

वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता सिडकोकडील पोकलेन, जे.सी.बीयांचा वापर करण्यात आला आहे.

तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image