खारघरमधील आरक्षित ट्री बेल्टवरील अतिक्रमण मा.नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या सतर्कतेमुळे हटवीले

खारघरमधील आरक्षित ट्री बेल्टवरील अतिक्रमण मा.नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या सतर्कतेमुळे हटवीले



खारघर(प्रतिनिधी),दि.१९-खारघर सेक्टर-१९ मधील काही सोसायटींच्या मागील भागात महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागेवरती काही समाजकंटक अनधिकृत बांधकाम करीत होते,हे परिसरातील राज रेसिडेन्सी,पूजा रेसिडेंन्सी आणि रिजंन्सी क्रिस्टल येथील काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ खारघरमधील माजी नगरसेविका सौ.नेत्रा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या निदर्षनास ही बाब आणून दीली.

     सौ.नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांनी तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनास आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना कळवीले आणि तात्काळ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने निष्कासनाची कारवाई केली.याप्रसंगी वरील तीन्ही सोसायट्यांचे आबाल-वृद्ध व महिला मोठ्या संख्येने एकत्रित जमल्यामुळे हे शक्य झाले.सर्वांच्या एकजुटीने व प्रशासनाच्या सहकार्याने त्या ठिकाणी अनाधिकृत होणारे बांधकाम थांबवता आले.   

     रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संगोपनाची जबाबदारी देखील सोसायटीतील रहिवाशांनी घेतली. खारघर शहरातील अशा बऱ्याच ठिकाणी होणारे अतिक्रमण अथवा जागा अडकण्याचे प्रकार हे सिडको व पनवेल महानगरपालिका प्रशासनाने जागरूकतेने हाताळावेत व वेळीच अशा समाजकंटकांना रोखावे अशी मागणी सौ.नेत्रा पाटील यांनी केली आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image