जागतिक एड्स दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन


                                                                                   

 

जागतिक एड्स दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन


नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व 2 माता बाल रुग्णालयांमार्फत राबविण्यात येत आहेनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाशीऐरोली व नेरुळ ही 3 सार्वजनिक रुग्णालये तसेच माता बाल रुग्णालय तुर्भे व कोपरखैरणे येथे सन 2002 पासून आयसीटीसी केंद्र कार्यान्वित असून सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे ॲन्टी – रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी केंद्र) सन 2009 पासून कार्यान्वित आहेयाठिकाणी नमुंमपा कार्यक्षेत्रातील तसेच नमुंमपा क्षेत्राबाहेरील उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांची एचआयव्ही तपासणीत्यांचे समुपदेशन आणि मोफत औषधोपचारांची नियमित सेवा दिली जाते.

दरवर्षी डिसेंबर रोजी जगभरात जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतोयावर्षी डिसेंबर 2023 रोजी संपन्न झालेल्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य समाजाच्या पुढाकाराने करू एच आय व्ही एड्सचा समूळ नाश (Let Communities Leads)’ हे होतेत्यानुसार राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत एड्सचा समूळ नाश करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवण्यात आले असून त्यासाठी समाजाचा पुढाकार अपेक्षित आहे.

त्या अनुषंगाने डिसेंबर 2023 रोजी नमुंमपा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले व जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आलायामध्ये महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने निबंध व चित्रकला स्पर्धारॅलीमहाविद्यालयांमध्ये जनजागृतीपथनाटय तसेच आहारतज्ज्ञ यांच्यामार्फत रुग्णांना आहाराबाबत मार्गदर्शनरुग्णांना फळ वाटप व समुपदेशन अशा विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले.

जागतिक एड्स दिनानिमित्त HIV–TB समन्वय अंतर्गत एनटीईपी मध्ये उत्कृष्ट काम केल्याबदृल नवी मुंबई महानगरपालिकेस व्दितीय क्रमांक प्राप्त झाला असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहेया व्यतिरिक्त सार्वजनिक रुग्णालय, वाशी आयसीटीसी यांना प्रथम क्रमांक व सार्वजनिक रुग्णालय नेरुळ आयसीटीसी यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

जागतिक एड्स दिनानिमित्त नागरिकांनी आपली एचआयव्ही स्थिती जाणून घ्यावी तसेच एचआयव्हीचा कलंक आणि भेदभाव याविरुद्ध ठामपणे उभे राहून एचआयव्ही बाधित समुहाला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यासोबतच याबाबतच्या आधिक माहितीसाठी 1097 या क्रमांकावर संपर्क साधावा असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे

Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image