महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
पनवेल,दि.6 : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आज भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने पनवेलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयुक्त गणेश देशमुख , माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, प्रभाग अधिकारी रोशन माळी, भांडार विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड सह पालिकेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी ,कर्मचारी, माजी नगरसेवक, विविध संघटनाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पुतळापरिसराची नुकतीच स्वच्छता करण्यात आली होती. तसेच आज मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणी दादरला,चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी चहा ,पाणी व बिस्किटे यांची सोय महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.