विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्तांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पनवेल ,दि.5 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आज दिनांक 5 डिसेंबर रोजी मुख्यालयात झालेल्या बैठकित प्रशासक तथा आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी घेतला. यावेळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.
यावेळी उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी,मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, , लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर ,सुधीर सांळुखे, राजेश कर्डिले यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापालिका भरती परीक्षेच्यादृष्टीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा आयुक्तांनी घेतला. दिनांक 8,9,10,11 डिसेंबर रेाजी महापालिका भरती परीक्षा महाराष्ट्राच्या सहा प्रशासकिय विभागांमध्ये होणार आहे. यासांठी महापालिकेने परिपूर्ण नियोजन केले आहे , त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली.
याबरोबरच महापालिकेच्या गाडयांसाठी वर्कशॉप बांधणे, शवविच्दछेदन गृहासाठी जागा देणेबाबत सिडकोकडे पाठपुरावा करणे, बावन्न बंगला येथे रिटेनिंग वॉल बांधणे, महापालिका हद्दीतील 57 बाजार विकसित करणे, सिडकोकडील भूखंड हस्तांतरण करणे, कळंबोली येथील 72 खाटांचे रूग्णालय उभारणे, नवीन कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत नियोजन करणे, महापालिका हद्दीतील सर्व उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण करणे, या कामांचा आढावा घेऊन कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी आज झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित दिल्या.