हल्ली झाली,....पायमल्ली...!
(बापूजींप्रत )
'ईश्वराला साक्ष!' ठेवून शपथ घेण्याचा प्रघात बापू,..
सहन होईना इतकी त्याची 'पायमल्ली' झाली !
इतिहास जमा झाली ती 'सत्यवचनी परिभाषा',...
'फेक आश्वासकांची टोळी' गल्लोगल्ली झाली!
कमाल मोठी नाही,येथे धमाल रोज आहे बापू!
'सत्ता'-साम्राज्याची 'स्पर्धा' हल्ली-हल्ली झाली !
'कुणी कुणाला धोका दिला'हे महत्वाचं नाहीच येथे,
पक्षश्रेष्ठींच्या 'आत्म'नीष्ठेची कुठं खिल्ली झाली?
शहर 'शहर' राहिलं नाही,.अन् खेडं 'खेडं' सौख्याचं,
राजकीय चढाओढीत वाडीवस्तीची 'दिल्ली' झाली!
ख-या लोकजागृतीची शक्यताही मारली जाते,..
'यंत्रणा'ही संसर्गाने 'हावभुकेली' झाली!
'जाणकारांची उदासिनता' ही वादाची मेख आहे!,
सत्ताकामी 'फुटीरता'ही शब्द परवली झाली!
राजकीय शर्यतीत, खालपासून वरपर्यंत,
बाहूगर्दीत विश्वासाची मिठी पार ढिल्ली झाली !
माणसं माणसं राहिली,... फक्त,...
राजकारणी 'वल्ली' झाली !
सत्य,समता,न्याय,बंधूता यांची मात्र,-
बापू!, खूप पायमल्ली झाली !
खूप,..पायमल्ली झाली !
प्रा.श्री.संभाजी यदू मगर