मांगुर माशाची विक्री, खांदेश्वर पोलिसांचा छापा

 मांगुर माशाची विक्री, खांदेश्वर पोलिसांचा छापा


नवीन पनवेल : देवद येथे मोकळ्या जागेत मांगुर माशांची विक्री करणाऱ्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
      देवद हद्दीतील पुष्प नारायण सोसायटी बिल्डींग नंबर 25 जवळील जागेत बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री होत असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि सीबी लांडगे यांना मिळाली. त्यानुसार वपोनी लांडगे व पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. त्यांनी मांगुर मासे विक्री होत असलेल्या जागेवर छापा टाकला. यावेळी 511 किलो बंदी असलेले मांगुर मासे जप्त करण्यात आले व ते नष्ट करण्यात आले. परिसरात अशा प्रकारे कुठे बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री किंवा साठवणूक किंवा मांगुर माशाचे पालन केले जात असेल तर याची माहिती ताबडतोब 112 नंबर वर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.या माश्याच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची संभावना असते. त्यामुळे हा मासा कोणीही खाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image