लाचेची मागणी केल्या प्रकरणी आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल

 लाचेची मागणी केल्या प्रकरणी आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल


नवीन पनवेल : पनवेल आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंद करण्यासाठी 18 हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरटीओ एजंट कमलेश सिंह यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात देखील लाच मागितल्या प्रकरणी एका एजंट वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

        पनवेल ( कळंबोली) आरटीओ कार्यालयात 44 वर्षीय तक्रारदार यांच्या टँकरचे ओपन बॉडी अशी आरसी बुक व परमिट मध्ये नोंद करण्याच्या कामाकरीता गेले असता खाजगी इसम आरटीओ एजेंट कमलेश किसनपाल सिंह यांनी या कामाकरीता १८ हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा काम होणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या पथकाने पंच-साक्षीदार यांच्या समक्ष केलेल्या पडताळणीत खाजगी इसम कमलेश सिंग यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध भ्र.प्र.आधी.१९८८(संशोधन २०१८) चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे दुरध्वनी  क्रमांक 022- 20813598/ 20813591, टोल फ्रि क्रं. १०६४ यावर संपर्क साधावा.
 


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image