समाजातील सर्व घटकांनी ध्वजदिन निधीसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन

                                                                                         

सैनिकहो तुमच्यासाठी…!


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम दि.११ डिसेंबर २०२३ रोजी


समाजातील सर्व घटकांनी ध्वजदिन निधीसाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन

 


*ठाणे, दि.10(जिमाका) :-*  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून व देणगी स्विकारून करण्याचे निश्चित झाले आहे.

     भारताच्या थलसेना, नौसेना व वायुसेनेच्या वीर योध्यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणाला लावले तसेच ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. 

      युध्दात / मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वीर माता, वीर पिता, वीरपत्नी यांना आर्थिक मदत, अपंग सैनिक व त्यांचे अवलंबित यांना आर्थिक मदत, माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती साठी देण्यात येणारी आर्थिक मदत, माजी सैनिक / विधवा पत्नी यांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत इत्यादी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, या कार्यालयाकडून ध्वजदिन निधी उभारण्यात येतो. 

      समाजातील विविध घटकातील मान्यवरांनी, नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष, AFFD फंड ZSWO, ठाणे यांच्या नावाने ध्वजदिन निधी द्यावा. ध्वजदिन निधी देणगी जमा करण्यासाठी ॲक्सिस बँक, टेंभी नाका शाखा, खाते क्रमांक 91500057060732, IFSC कोड UTIB0002169, MICR कोड 400211130, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते क्र.11100527522, IFSC कोड SBIN0000489, SBI ठाणे मुख्य हे दोन खाते सुरु आहेत. देण्यात येणाऱ्या या देणगीवर 80(G) अंतर्गत 100 टक्के कर सवलत आहे.

      तरी नागरिकांनी सढळ हाताने आपली बहुमूल्य मदत करुन या सत्कार्यास सक्रिय हातभार लावावा व आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवावे, तसेच या राष्ट्रीय कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, सामाजिक संस्थांनी, शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी सोमवार, दि.११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.४५ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, ध्वजदिन निधी संकलन समिती श्री. अशोक शिनगारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (नि.) यांनी केले आहे.