पनवेल महापालिकेच्या कार्यकाळातील 41 संवर्गातील 377 पदांच्या पहिल्या भरती परीक्षा उत्साहात संपन्न


पनवेल महापालिकेच्या कार्यकाळातील 41 संवर्गातील 377 पदांच्या पहिल्या भरती परीक्षा उत्साहात संपन्न


पनवेल दि.11: पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची पहिली ऑनलाइन भरती परीक्षा आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या उत्तम नियोजनाच्या माध्यमातून सुरळीतपणे संपन्न झाली. दिनांक 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कार्यकाळात  झालेली ही परीक्षा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील 57 केंद्रावरती  सुरू असलेली ही परीक्षा व्यवस्थितरित्या संपन्न झाली.

पनवेल महानगरपालिकेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली ,या महापालिकेसाठी आकृती बंधानूसार एकुण मंजूर पदे 1043 मंजूर झाली होती.यामधील भरती प्रक्रियेमध्ये सरळसेवेच्या 41 संवर्गातील 377 पदे भरणे करिता टीसीएसच्या माध्यमातून ही पहिलीच परीक्षा घेण्यात आली. पालिकेच्या 41 संवर्गाकरिता होणाऱ्या या परीक्षेसाठी एकुण 55 हजार 214 पात्र अर्ज प्राप्त झाले होते. दिनांक 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान तीन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेकरीता सहा विभागातील 21 जिल्ह्यात एकूण 57 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

                 पनवेल महानगरपालिकेच्या भरती परीक्षा विना तक्रार पार पाडण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका मुख्यालय येथे कंट्रोल रुम तयार करण्यात आली होती. त्यामध्ये TCS कंपनींचे  प्रतिनिधी , विभागीय समन्वयक, तसेच  महापालिका अधिकारी व कर्मचारी  गेले चार दिवस सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यत कार्यालयात कार्यरत होते. 

                 परिक्षा केंद्रांवर येणाऱ्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण या महापालिका मुख्यालय कंट्रोल रुममधून करण्यात आले. प्रत्येक परिक्षा केंद्रांवर पोलीस व्यवस्था, मोबाईल जॅमर, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय इ. सोयी करण्यात आल्या होत्या. या भरती परीक्षेसाठी 21 जिल्ह्यात एकूण 57 परीक्षा केंद्रावरती दिनांक 8 डिसेंबर रोजी 77.61 टक्के, दिनांक 9 डिसेंबर रोजी 75.60टक्के,दिनांक 10 डिसेंबर रोजी 77.49 टक्के,दिनांक 11 डिसेंबर रोजी 78.15 टक्के उमेदवारांची उपस्थिती राहीली. परीक्षेक्ष्या चार दिवसांमध्ये एकुण 55 हजार 214 उमेदवारांपैकी 42 हजार 832 उमेदवार या परीक्षेस उपस्थित होते.

दरम्यान आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या संपुर्ण मार्गदर्शनाखाली नियोजित केलेल्या गेले चार दिवसापासून सुरु असलेल्या या भरती परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून ही भरती परीक्षा सुरळीत पार पडली असल्याची  माहिती आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.

चौकट

या परीक्षेसाठी पनवेल महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेले चार दिवसापासून रात्रंदिवस अव्याहतपणे कष्ट घेतले. आज दिनांक 11 डिसेंबर रोजी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये सर्व समन्वयक, प्रत्येक ५७ परीक्षा केंद्रावरील केंद्र समन्वयक अधिकारी व कर्मचारी, तसेच सर्व जिल्हा समन्वयक अधिकारी ,पालिका  कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून सर्वांच्यावतीने सहा विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहिलेले उपायुक्त सचिन पवार, उपसंचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त गणेश शेटे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे तसेच आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे , सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, विभाग प्रमुख नामदेव पिचड त्याचप्रमाणे तसेच टीसीएस कंपनी प्रतिनीधी अभिषेक कदम व जॅमरच्या इसीआयएल कंपनीचे राम नारायण मालविया या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.