महेंद्र कोंडे लिखीत ‘बावनकशी’ काव्यसंग्रहाचे 17 डिसेंबरला ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाशन


 

महेंद्र कोंडे लिखीत ‘बावनकशी’ काव्यसंग्रहाचे 17 डिसेंबरला ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात प्रकाशन




 नवी मुंबई-‘मी कविता करतो, तुमचा गैरसमज, मी माझ्या ह्रदयाची, स्पंदने टिपतो फक्त’ अशी भावस्पर्शी कविता लिहिणा-या महेंद्र कोंडे यांच्या ‘बावनकशी’ काव्यसंग्रहाच्या दुस-या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ रविवार, 17 डिसेंबर रोजी, सायं. 6 वाजता, स्टेशन रोड, ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा.अ.रेगे सभागृहात नामांकित कवी अशोक नायगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, सुप्रसिध्द लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. दूरदर्शन निवेदिका डॉ. मृण्मयी मगदूम या समारंभाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

 

महेंद्र कोंडे यांची प्रत्येक कविता म्हणजे संवेदनशील जगण्याने घेतलेली एक सुरेल तान असून असस्ल मराठी भाषेचा पीळ त्यांच्या कवितेला आहे अशी प्रशंसा करीत कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी जीवनाच्या विविधतेला स्पर्श करणारे शब्दांचे हे सोने बावनकशी असल्याचा अभिप्राय दिला होता. प्रा.प्रवीण दवणे, प्रा.अशोक बागवे, अरूण म्हात्रे या काव्यत्रयीनेही त्यांच्या कवितेचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे. अशा ‘बावनकशी’ काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती सकाळ प्रकाशनच्या वतीने 17 डिसेंबरला प्रसिध्द होत असून काव्यरसिकांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून बावनकशी कवितेचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.   

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image