पनवेलच्या सरोवर हॉटेलचा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ;कचोरीत आढळला खडा
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल शहरामधील पनवेल बस डेपो समोर असणारे सरोवर हॉटेलमध्ये अनेक ठिकाणाहून उच्चभ्रू लोक जेवणासाठी नाश्ता करण्यासाठी येत असतात मात्र नुकतेच या ठिकाणी पेण परिसरातून कामानिमित्त पनवेल येथील सरोवर हॉटेल येथे आलेल्या नागरिकांना नाश्ता करत्यावेळी आलेल्या मेनुमध्ये कचोरीमध्ये खडा सापडला आहे. स्वच्छता व टापटीपपणाचा देखावा करणाऱ्या सरोवर हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याने भविष्यात नागरिकांच्या शरीरास हानी पोहचू शकते. याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला हा प्रकार ऑनकॅमेरा दाखवून दिला मात्र व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. याबाबत लवकरच अन्न व औषध प्रशासनाने सरोवर हॉटेलची पूर्ण तपासणी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तसेच सरोवर हॉटेलमध्ये जेवणासाठी जाताना जरा जपूनच असा सल्ला देखील तक्रारदार यांनी माध्यमांद्वारे दिला आहे.