पनवेल महानगरपालिका विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्तांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पनवेल ,दि.16 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आज(16 ऑक्टोबर) आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. यावेळी कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.
यावेळी अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य अभियंता जगताप,मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते लेखापरिक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शवविच्दछेदन गृहासाठी जागा देणेबाबत सिडकोकडे पाठपुरावा करणे, महापालिका हद्दीतील 57 बाजार विकसित करणेसाठी सल्लागारांची नेमणूक करणे, सिडकोकडील भूखंड हस्तांतरण करणे, महापालिका हद्दीत कत्तलखाना बांधणे, महापालिका क्षेत्रातील बेवारस वाहनांवर कारवाई करणे, महापालिका हद्दीतील सर्व उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण करणे, माताबाल संगोपन केंद्र , वॉटर मिटर बसविणे, या कामांचा आढावा घेऊन कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी आज झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित दिल्या.
शाळांसाठी हस्तांतरीत झालेल्या भूखंडावर शाळा बांधणे, कळंबोली येथे महापालिकेचे रूग्णालय सुरू करणे, विविध तलावांचे सुशोभिकरण करणे , अशा विविध कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेऊन त्या त्या विभागास कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या.
चौकट
*महापालिका हद्दीमध्ये बेवारस वाहनांवरती कारवाई *
महापालिका हद्दीमध्ये चारही प्रभागांमध्ये सध्या बेवारस वाहनांवरती कारवाई सुरू आहे. विभागप्रमुखांच्या बैठकित या कामाचा आयुक्तांनी आढावा घेतला. यावेळी चारही प्रभागांमध्ये आत्तापर्यंत 125 वाहनांवरती बेवारस वाहनांची नोटीस लावण्यात आली असून यापैकी सुमारे 74 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या जप्त वाहनांपैकी 9 संबधित वाहनांच्या मालकांनी दंड भरून आपली वाहने नेली असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी यावेळी दिली.
चौकट
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने यावर्षी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम हाती घेतली होती. यासाठी महापालिकेने विशेष जय्यत तयारी केली होती. यावर्षी महापालिकेने कृत्रिम तलावांमध्ये वाढ केली होती, तसेच अभिनव मुर्तीदान सकंल्पना नियोजनपुर्वक राबविली. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या संकल्पनेचा स्वीकार करून, महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विभागप्रमुखांच्या आजच्या बैठकित आयुक्तांनी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ ही मोहिम यशस्वीपणे राबविल्याबद्दल अभिनंदन केले.