चि.दुर्वा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न

 चि.दुर्वा  वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न


नवीन पनवेल(प्रतिनिधी): नवीन पनवेल मधून प्रकाशित होणाऱ्या रायगड शिव सम्राट वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका प्रियांका सुचित पाटील यांची सुकन्या चि. दुर्वा हिचा 5 वा वाढदिवस नुकताच नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांनी आपली नात चि. दुर्वा हिच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथे सकाळी 10 ते दुपारी 2 च्या दरम्यान मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केला होता, तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

         नवीन पनवेल येथील शिवतेज मित्र मंडळाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक या ध्येय धोरणा नुसार साप्ताहिक रायगड शिव सम्राट, गुड हेल्थ ग्रुप, नवीन पनवेल, एसएनआय केअर हॉस्पिटल आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आला होता, यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेऊन नेत्र चिकित्सा करून घेतली, यावेळी मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची नोंद करून त्यांची आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याचे शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी सांगितले.
        नियोजनबद्ध पार पडलेल्या उपक्रमादरम्यान चि. दुर्वा हिला शुभेच्छा देण्यासाठी खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा वारगडा, समाजसेवक  पांडुरंग भगत, रविंद्र पाटील, ग्रामसेवक हेमंत राठोड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक सोनारघरे, रोनक ग्राफिक्सचे संचालक रमेश फडके, सृष्टी कॉम्प्युटरचे संचालक अक्षय वर्तक आणि रिया कुळये, पनवेल राजचे संपादक सुभाष वाघपंजे, क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, गुड हेल्थ ग्रुपचे पुंडलिक पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश जगदाळे, खैरेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी भालचंद्र खैर, शिवतेज परिवाराचे संदेश पाटील, सुनंदा पाटील, सुनिता पाटील, सुवर्णा पाटील, निशांत बताले, आशा बताले, एसएनआय केअरच्या मंदाकिनी कांबळे, नुतन केळस्कर, छाया सुर्यवंशी, ऋतुजा पळसेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.