क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे चला खेळूया मंगळागौर कार्यक्रम संपन्न

 क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे चला खेळूया मंगळागौर कार्यक्रम संपन्न 



पनवेल / प्रतिनिधी 

पनवेलमधील क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे चला खेळूया मंगळागौर व नवदुर्गा नवरात्रनिमित्त ९ रणरागिणींचा सन्मान सोहळा नुकताच पनवेल खांदा कॉलनी येथील बेलेंजा हॉल याठिकाणी साजरा करण्यात आला. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. दुर्गा मंगळागौरणे मानाची पैठणी पटकावली, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मंगळागौर पूजन हळूहळू कालबाह्य होत चालले आहे. तरीदेखील काही महिलांच्या संघटनांनी आजही हि परंपरा कायम ठेवलेली आहे. मंगळागौरच्या कार्यक्रमातून महिलांच्या मनाला आनंद तर मिळतोच मात्र यानिमित्ताने शरीरालाहि व्यायाम होतो. सध्या महिला या नोकरी करणाऱ्या असल्याने मंगळागौर जागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु हि परंपरा व पारंपरिक खेळ टिकला पाहिजे यासाठी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील खांदा कॉलनी येथील बेलेंजा हॉल याठिकाणी "चला खेळूया मंगळागौर" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन समाजसेविका डॉ. वनिता गडदे राजे, भागीरथी कोलकर मॅडम, समाजसेविका उषा दत्त, अभिनेत्री उर्मिला डांगे,अपर्णा खानोकर,समाजसेविका शशी देसाई,यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे, डॉ. सनी वालिका,संजीवनी मालवणकर,स्नेहा धुमाळ, नंदिनी गुप्ता, विशाखा मोहिते, रेशमा सानप,बेबो सानप  सदस्य आदी उपस्थित होते. 

यावेळी नाखुळ्याबाई नखुल्या, चंदनाच्या टिकुल्या, एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली, किस बाई किस दोडका किस, दोडक्याची फोड लागते गोड, झिम पोरी झिम यासारख्या गाण्यांवर महिलांनी मंगळागौर खेळून साजरी केली.