नवीन पनवेल येथे मनसेच्या हंडीला शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती
नवीन पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आदिती सोनार जिल्हा अध्यक्ष रायगड आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2023 पोलीस ग्राउंड, सेक्टर पाच, गुरुद्वारा जवळ, नवीन पनवेल येथे शर्मिला राज ठाकरे यांच्या प्रमूख उपस्थीतीत पार पडला. या वेळी रिटा गुप्ता सरचिटणीस मनसे, स्नेहल जाधव चिटणीस मनसे, जितेंद्र पाटिल जिल्हाध्यक्ष, रायगड संदेश ठाकूर जिल्हाध्यक्ष, योगेश चिले पनवेल महानगर पालिका अध्यक्ष, केसरी पाटील जिल्हा सचिव, तानाजी पिसे रस्ते आस्थापन, अंकुर पाटील, गणेश सरवणकर हे मान्यावर उपस्थित होते.
या दहीहंडीला एक लाख 11 हजार 111 रुपयांचे एकूण पारितोषिके होती. पुरुष हंडी फोडायचा मान पनवेल कोळीवाडा यांना देण्यात आला. रोख रक्कम आणि ट्रॉफी 8 थर लावून दर वर्षी प्रमाणे यंदाही त्यांनीच पटकावली. मानाची महीला दहीहंडी 7 थर लावून बाळ शिवराज गोविंदा पथक, मुंबई यांनी पटकावला. यावेळी रोख रक्कम व ट्रॉफी सर्वच बक्षीसे शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली. पुढील वर्षी आणखी जोशात दहीहंडी उत्सव साजरा करा आणि आदिती सोनार यांनी दहीहंडीचे उत्कृष्ट नियोजन केलं आहे ह्या साठी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे कौतुक देखील केले. वर्षा पाचभाई, रेखा पवार, स्नेहल बागल, प्रीती खानविलकर, अशिता पाटील, सोनल कदम, स्वरूपा सुर्वे, मनीषा देशमुख , पराग बालड , संदीप जाधव, सचिन जाधव , शिरीष सोनार व सर्वच महिला पुरुष पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थीती लावली.