मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; सोमवारी नियोजन आढावा बैठक

 मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'; सोमवारी नियोजन आढावा बैठक 



पनवेल (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका व शहरातील गरिब व गरजू जनतेसाठी 'मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर'चे  आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक सोमवार दिनांक ०२ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३ वाजता खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 
       महाशिबिरात आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचार मोफत केले जाते. याचा १५ हजारहून अधिक नागरिक लाभ घेत असतात, त्यामुळे सर्व रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी नियोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी या नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.