साप्ताहिक लोकनिर्माण आणि दैनिक लोक टाइम्स कार्यालयाचे उद्घाटन

 साप्ताहिक लोकनिर्माण आणि दैनिक लोक टाइम्स कार्यालयाचे उद्घाटन




नवीन पनवेल(रत्नाकर पाटील):
साप्ताहिक लोकनिर्माण आणि दैनिक लोक टाइम्सच्या नवीन पनवेल येथील कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच (दि.2सप्टेंबर) पनवेल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या शुभहस्ते आणि पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रत्नाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नवीन पनवेल  सेक्टर 14 येथील ई१,०८ मध्ये  सुरू करण्यात आलेल्या कार्यालयच्या शुभारंभप्रसंगी साप्ताहिक लोकनिर्माणचे मुख्य संपादक बाळकृष्ण कासार, दैनिक लोक टाइम्स, लोकनिर्माणचे निवासी संपादक सुनील भुजबळ,  उपसंपादक संपत सुवर्णा, सप्तपदी नाट्य अभिनेते संतोष गायकर, लोकांकितचे संपादक संजय पवार, मराठा सेवा संघ अध्यक्ष प्रकाश चांदिवडे, पत्रकार प्रवीण मोहोकर, भगवान कोलगे, संजय हिरेमठ, सामाजिक कार्यकर्ते वसंत सोनावणे, एम.आर. कदम, विष्णू गवस, नरेश पाटील, ॲड. किशोर टोंपे, समीर भगत, रमेश फडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी म्हणाले की, कार्यालयाच्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्या देत असतांना सर्व स्थरातील लोकांना न्याय मिळाला पाहीजे,  त्याच अनुषंगाने बातम्या प्रकाशित करण्यासाठी येथील पत्रकारांनी आपले निपक्षपाती योगदान द्यावे जेणेकरून सामाजिक, राजकीय , धार्मिक चालू घडामोडी विषयी सर्व जनतेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहिती वाचायला मिळेल याची दक्षता घ्यावी. असेही गणेश कोळी म्हणाले.

यावेळी बोलताना रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील म्हणाले की, लोकनिर्माण आणि लोकराज्य या वृत्तपत्राच्या माध्यमातून दिनदुबळ्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य आपल्या लेखणीतून घडो, तसेच पत्रकारितेच्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे कार्य निर्भिडपणे आपल्या हातून घडो, असा आशावाद रत्नाकर पाटील यांनी व्यक्त केला.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image