रायगड शिव सम्राट आरती संग्रहाचे प्रकाशन

 रायगड शिव सम्राट आरती संग्रहाचे प्रकाशन



नवीन पनवेल(प्रतिनिधी): पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांच्या रायगड शिव सम्राट वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे म्हणाले की, श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला रायगड शिव सम्राट वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, हे माझ्या दृष्टीने अभिमानास्पद असून संपादक रत्नाकर पाटील यांनी जो मला सन्मान दिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील, रायगड सम्राट न्यूज चॅनेलचे संपादक शंकर वायदंडे, पनवेल राजचे संपादक सुभाष वाघपंजे, क्षितिज पर्वचे संपादक सनिप कलोते, कर्नाळा न्यूज चॅनेलचे संपादक दत्ता मोकल, युथ महाराष्ट्रच्या संपादिका दिपाली पारसकर, एस एन न्यूज चॅनेलचे संपादक आशिम शेख,  उद्योजक शशिधर माळी, समाजसेवक राजेंद्र पाटील, दत्तात्रय पयेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.