खारघर वाहतूक पोलिसांची कारवाई
नवीन पनवेल : खारघर परिसरात वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
जलवायु विहार, सेक्टर 20, खारघर येथे दुपारी वाहतुकीस अडथळा होईल अशा लावलेल्या एकूण 8 चार चाकी वाहनांवर खारघर वाहतूक पोलिसांकडून 122 प्रमाणे इ चलन कारवाई करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी बेलपाडा गॅरेज लाईन या परिसरात वाहतुकीस अडथळा होईल अशा लावलेल्या 15 वाहनांवर इ चलन कारवाई करण्यात आली आहे. डी मार्ट, सेक्टर 15 खारघर येथे वाहतुकीस अडथळा होईल अशा लावलेल्या एकूण 24 वाहनांवर इ चलन कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एस काणे, महिला पोलीस नाईक तुरे ए ए, पोलीस कॉन्स्टेबल एन डी पाबळे यांनी ही कारवाई केली. खारघर वाहतुक शाखा हद्दीत विविध ठिकाणी अशी कारवाई यापुढे चालू राहणार आहे.