मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे मंगळवार 8 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत पाणीपुरवठा नाही - पाणी जपून वापरण्याचे आवाहन

मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे मंगळवार 8 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत पाणीपुरवठा नाही - पाणी जपून वापरण्याचे आवाहन


नवी मुंबई/प्रतिनिधी-नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवार दिनांक 08/08/2023 रोजी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा  8 ऑगस्ट 2023 रोजी बंद राहणार आहे. 

          त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक 08ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणीपुरवठा देखील बंद राहील. त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी कमी दाबाने  पाणी पुरवठा होईल.

तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.  

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image