अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन

 अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन



पनवेल : आषाढी एकादशी निमित्त "अभंगरंग" या कार्यक्रमाचे आयोजन मैत्री मल्टीक्रिएशन्स यांच्यातर्फे पनवेल येथे करण्यात आले होते. यावेळी पंडित आनंद भाटे आणि गायिका केतकी माटेगावकर यांच्यासोबत सिनेअभिनेते विघ्नेश जोशी, पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते.

     या कार्यक्रमासाठी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्नेहकुंज आधार गृह नेरे येथील आजी-आजोबा यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलावले होते. या आजी-आजोबांच्या लेकरांनी जरी यांच्यावरील लक्ष कमी केले असले तरीसुद्धा आपण एक माणूसकी म्हणून त्यांच्या वयोमानानुसार पंढरपूरला जरी नेऊ शकत नसलो तरी सुद्धा या कार्यक्रमाची त्यांची आवड पाहता त्यांना नक्कीच काही क्षणाचा एक सुखद अनुभव देऊ शकतो या विचाराने त्यांना बोलावले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्या डोळ्यातील आपुलकीचे भाव पाहून पनवेलमध्येच साक्षात विठू माऊली चे दर्शन मिळाल्याचा भास झाला असे मत माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे  यांनी व्यक्त केले.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image