"नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

"नवी मुंबईच्या धर्तीवर पनवेलला सुद्धा करमाफी मिळावी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी



पनवेल :  पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील सिडको विभागातील मालमत्ता कराबाबत अजूनही संभ्रम आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर भरण्याबाबत पालिकेने रहिवाश्यांना नोटीस बजावल्या आहेत. यावर प्रितम म्हात्रे यांनी वेळोवेळी सवलती संदर्भात पाठपुरावा केलेला आहे.

         मालमत्ता करमाफीसाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास सरकार अनुकुल आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली. नवी मुंबई महानगरपालिकेने PAP (प्रकल्प प्रभावित व्यक्ती) निवासी मालमत्तांसाठी मालमत्ता कर दंड वसूलीचा निर्णय तात्काळ स्थगित ठेवला आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या मालकांकडून मालमत्ता वसुली करण्यावर भर देण्यात आला होता. राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यानंतरच प्राधिकरण पुढील निर्णय घेईलअसे समजले आहे.

   

चौकट

पनवेलच्या शेजारीच असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यास शासनाकडे मागणी केलेल्या धरतीवर त्याचा योग्य तो अभ्यास करून त्याची माहिती मागवून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस स्क्वेअर फिट पर्यंत असलेल्या घरांना करमाफी करण्यात यावी.-प्रितम जनार्दन म्हात्रे,मा. विरोधी पक्षनेता, पनवेल महानगरपालिका

 

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image