खारघर मध्ये विजेच्या खांबाचा शॉक लागून सहा बकऱ्यांचा मृत्यू
खारघर/प्रतिनिधी :खारघर मध्ये विजेच्या खांबाचा शॉक लागून सहा बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. खारघर शहरातील सेक्टर १० मध्ये ज्वेल एकविरा बिल्डिंग बाहेरील फुटपाथ वर नईम कुरेशी हा बकरे व मुलांना घेऊन चालत जात होता. यावेळी फुटपाथ वर असलेल्या विजेच्या खांबाला शॉक लागून विजेचा झटक्याने सहाच्या सहा बकरे जागीच मृत्यू पडले. हा शॉक चा झटका एवढा तीव्र होता की क्षणात बकऱ्यांनी जीव गमावला. सुदैवाने नईम कुरेशी याची तीन लहान मुले थोडक्यात बचावले. मुलांना हा प्रकार दिसताच त्यांनी तेथून पळ काढला व बाजूला झाले. बकरे व्यवसायाचे यात लाखाचे नुकसान झाले आहे. यात पनवेल महानगरपालिका विद्युत विभागाने निष्काळजीपणाने काम केले असल्याचा आरोप बकरे विक्रेत्याने केला आहे. बकरी ईद कुर्बानी साठी देण्यात येणारे बकरे ऑर्डरनुसार मागवले होते ते देण्या करता जात असताना हा प्रकार घडला असे बकरे व्यावसायिक नईम लाला कुरेशी यांनी सांगितले.
कोट-
महानगरपालिकेने कोणताही अनुभव नसलेल्या नेमस्त या कंपनीला विज-पुरवठा आणि दुरूस्ती-देखभालीचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दीले असून,मी स्वतः या अगोदरच महापालिकेकडे या संदर्भात तीन वेळा लेखी तक्रार दीली आहे.या ठीकाणी ६ बकऱ्यांच्या जागी माणसे असती तर महापालिका प्रशासनाने ही जबाबदारी कोणावरती निश्चित केली असती.सदर कंपनीवरती दंडात्मक कारवाई करून कंपनीचे कंत्राट रद्ध करण्यात यावे.
-अजित अडसुळे
विधानसभा उपाध्यक्ष,शेकाप,पनवेल
कोट-
सदर कंपनीला दीलेले कंत्राट शासनाच्या नियमाधीन असून,या दुर्घटनेसंदर्भातील MSEB चा अहवाल आल्यानंतर दोषींवरती कारवाई करण्यात येईल.
-प्रितम पाटील
विद्युत अभियंता,खारघर विभाग,पनवेल मनपा