महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नफरत vs मोहब्बत पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नफरत vs मोहब्बत पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन



काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली पुस्तकाची प्रशंसा.

जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पुढाकाराने पुस्तकाचे झाले प्रकाशन.



उरण दि 24 जेष्ठ साहित्यिक तथा जेष्ठ कवी प्रा.एल.बीं पाटील यांच्या " नफरत vs मोहब्बत " असे शीर्षक असलेले आजच्या राजकीय वातावरणावरचे खळबळजनक विचार मांडणारे पुस्तक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या सभेत टिळक कांग्रेस भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन करण्यात आले. अ.भा.कां.क.सदस्य तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नामुळे हे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.उपस्थित २०० महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधीनां महेंद्रशेठ घरत यांनी "नफरत  Vs मोहब्बत" भारत जोडो ची पुस्तके सप्रेम भेट दिली.

 
       या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी गृहराज्यमंत्री   सतेज (बंटी )पाटील, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत, माजी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ताई ठाकूर, विलास मुत्तेवार,आमदार प्रणितीताई शिंदे,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर,संजय निरुपम, नसीमखान,माजी खासदार हुसेन दलवाई,प्रमोद मोरे, देवानंद पवार, राजु वाघमारे, चारूलता टोकस,राणी अग्रवाल, श्रीरंग बरगे, अ.भा.कां.कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना लेखक रायगडभूषण
प्रा.एल बी पाटील म्हणाले  की राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा ही यापूर्वी आजपर्यंत झालेल्या पदयात्रापेक्षा वेगळी आणि असामान्य झाली असून मोदी सरकारने देशात प्रचंड नफरत माजवली असताना देशाला मोहब्बत वाटून मानव जातीला मोठा संदेश दिला आहे,त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ.मनिष पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष  सुदाम पाटील,रायगड सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत, गणेश म्हात्रे,विवेक म्हात्रे,उमेश भोईर,राजन घरत,मोहन भोईर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले असेही पाटील यांनी सांगितले.
Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image