वरिष्ठ पत्रकार आणि संपादक गौरव जहागीरदार कामोठे-भूषण पुरस्काराने सन्मानित

वरिष्ठ पत्रकार आणि संपादक  गौरव जहागीरदार कामोठे-भूषण पुरस्काराने सन्मानित 


कामोठे: दि.4 जानेवारी ( प्रतिनिधी )  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणी  सुषमा पाटील विद्यालय जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज कामोठे यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दर वर्षी परिसरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. म्हणून  वरिष्ठ पत्रकार आणि संपादक  श्री गौरव जहागीरदार यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कामोठे भूषम पुरस्कार  घोषित केला होता.  गेले दोन वर्षे गौरव जहागीरदार हे  कोरोनाच्या काळात घरी न बसता लोकांना  निरंतर बातम्या  पोहचवत होते तसेच त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी मोठा सहभाग असतो त्यामुळे त्यांना या वर्षीचा कामोठे-भूषण या पुरस्करसाठी त्यांची निवड करण्यात आली होती.  त्यामुळे आज कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार कामोठे पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ स्मिता जाधव यांच्या हस्ते देण्यात आला . त्या वेळेस पनवेल महानगरपालिका चे माजी सभागृह नेते श्री परेश ठाकूर, नगरसेवक श्री दिलीप पाटील, भाजपा कामोठे अध्यक्ष श्री रवी जोशी, समाजसेवक श्री रमेश तुपे, भाउ भगत , गोपीनाथ गोवारी, अर्जुन गोवारी, पोळ सर, आणि सुषमा पाटील विद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मंदार पणवेलकर सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, इतर पाहुणे व अनेक दर्शक व गौरव जहागीरदार यांच्या पत्नी सौ सांगिता जहागीरदार उपस्थित होत्या.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image