समाजाने पत्रकारितेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक : जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार !
कोकण दर्पण १२ वा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पनवेल येथे संपन्न !
राघवजी पटेल समाजदर्पण, सूरदास गोवारी भूमिपुत्ररत्न, प्रदीप तिदार शौर्यश्री, प्रमोद चुंचूवार समता, डॉ.अभय शेटे हृदया पुरस्कार, रत्नमाला डोंगरगावकर शिक्षणदर्पण पुरस्कार, इम्तियाज शेख उद्योगदर्पण तर प्रा. सतीश साठे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित !
पनवेल : कोकण दर्पण वृत्तपत्राचा १२ वा वर्धापन दिन सोहळा, राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आणि कोकण रहिवाशी संघाचा स्नेह मेळावा शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. जेष्ठ साहित्यिक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या सोहळ्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी शुभेच्छा दिल्या. पनवेल मनपाचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, संपादक शरद सावंत, सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य आर के दिवाकर, शिवसेनेचे नेते दीपक घरत, माजी पोलीस अधिकारी शिवाजी पाटील, संपादक राजन वेलकर, उद्योजक रमेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३ सोहळ्यात शिक्षणमहर्षी राघवजी वाघजी पटेल यांना समाजदर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार प्रमोद चुंचूवार यांना देण्यात आला. सूरदास गोवारी यांना भूमिपुत्र- रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शौयर्श्री शहीद योगेश पाटील पुरस्कार नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप यांना देण्यात आला . शिक्षणदर्पण पुरस्कार राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा रत्नमाला डोंगरगावकर यांना देण्यात आला असून कोकण रत्न पुरस्कार प्रा. सतीश साठे यांना देण्यात आला. हृदया पुरस्कार डॉ अभय शेटे यांना देण्यात आला तर उद्योग दर्पण पुरस्काराने इम्तियाज शेख यांना गौरविण्यात आले.
कोविड काळात समाजसेवा करणाऱ्या संस्थांचा देखील कोकण दर्पण विशेष सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आले. यावेळी गीता सुशिल चौधरी अध्यक्षा : कमलज्योती फाऊंडेशन, हरजिंदर कौर हॅप्पी सिंग अध्यक्षा : व्हाल्यू ऑफ स्माईल फाउंडेशन, बीना जयेश गोगरी अध्यक्षा : शाश्वत फाउंडेशन, विजय काळुराम पाटील, अध्यक्ष : खारघरचा राजा सामाजिक संस्था, संजय राजाराम घरत अध्यक्ष : संवाद मंच, शिवाजी फकिरा पाटील अध्यक्ष : खान्देश विकास फाउंडेशन, लीना अर्जुन गरड
अध्यक्षा : कॉलनी फोरम, उषा आडसुळे, अजित आडसुळे सचिव : सुराज्य फाउंडेशन, अनिल साबणे
उपाध्यक्ष : शिवबंधन प्रतिष्ठाण, सचिन पवार युवा नेतृत्व, डॉ. सखाराम गारले संस्थापक : रेनोवेअर हेल्थकेअर सोल्युशन अध्यक्ष : शिवात्रिका कल्प फाउंडेशन, महाराष्ट्र मुख्य समन्वयक : कामोठे कॉलनी फोरम, निलेश मनोहर बाविस्कर अध्यक्ष : शुभारंभ सामाजिक संस्था, अमित दादा गडांकुश ( वस्ताद ) अध्यक्ष : छावा शिवकालिन बहुुद्देशिय कलामंच छावा प्रतिष्ठाण, आर के दिवाकर
सदस्य : सेंट्रल रेल्वे बोर्ड, शिरीष नारायणशेठ घरत अध्यक्ष : श्रीपुष्प फाउंडेशन, डॉ. संजय तारळेकर
जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ, MD शुश्रुषा हार्टकेअर सेंटर, शरद वसंतराव सावंत
अध्यक्ष : वसंतरावं चॅरिटेबल ट्रस्ट, पियाली सिकदर, संस्थापिका सिकदर, सल्लागार AIIITS : ALL INDIA INSTITUTE OF INTEGRATED TECHNICAL स्टुडीएस, मधू दौलतराव पाटील अध्यक्ष : क्रेडाई-एमसीएचआय, रायगड अध्यक्ष : खान्देश रहिवाशी संघ, सुरज नरेश म्हात्रे
चेअरमन : ग्लोबल एव्हीेएशन अकॅडमि डॉ. विकास कदम प्राचार्य, श्री. गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड, प्रा. संजय नरवाडे श्री. गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड सुरेंद्र चंद्रकांत मर्चंडे अडव्होकेट, मुंबई उच्च न्यायलय, रुपेश प्रभाकर मोहिते कवी - गायक आणि बौद्धजन पंचायत समितीचे चीरणीस तथा समाजसेवक प्रमोद सावंत यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता हि अत्यंत कर्तव्य - कठोर, न्याय-निष्ठुर आणि अतिबुद्धी प्राविण्य आणि युगप्रवर्तक अशी होती. पण बाबासाहेबांनी पत्रकारितेत एक भूमिका मांडली. आज समाजाने खंबीर नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. जो पर्यंत पत्रकारितेच्या पाठीशी समाज उभा राहणार नाही, तोपर्यंत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण होणार नाही, असे परखड मत जेष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या कोकण दर्पण १२ वा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मांडले. हा गौरव म्हणजे कोकणाने विदर्भाचा केलेला हा सन्मान आहे, अशी भावना देखील त्यांनी यावेळी मांडली.
समाजातील सर्व घटनांना सोबत घेऊन कोकण दर्पणच्या माध्यमातून पत्रकार, संपादक संजय महाडिक खऱ्या अर्थाने एक सामाजिक चळवळ उभी करीत आहेत. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून कोकण दर्पण खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा बनला आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी शुभेच्छा देताना काढले.
कोकण दर्पण हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब आहे. संजय महाडिक यांच्या सारखा धडपड्या पत्रकार खरोखरच समाजाचे प्रश्न मांडत आहे. कोकण दर्पणची वाटचाल नक्कीच गतिमान होईल अशा शुभेच्छा पनवेलचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिल्या.
समाजाचे दायित्व स्वीकारून खऱ्या अर्थाने समाजसेवा करणारे हिरे शोधून कोकण दर्पणने त्यांचा गौरव केला आहे. कोकण दर्पण खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा म्हणून कार्य करीत आहे, असे प्रतिपादन डॉ जी. के. डोंगरगावकर यांनी अध्यक्षीय भाषणात यावेळी केले.
कोकण दर्पण १२ वा वर्धापन दिन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे करण्यात आली तर राष्ट्रगीताने समारोप झाला. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन संपादक मुकेश शिंदे यांनी केले. कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी सर्वांचे आभार मानले.