राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

 


खारघर :-येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये  दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सी आर पी एफ चे सहायक कमांडंट श्री संजय चौहान, डॉ. रवि प्रकाश सिंग, प्रभारी अधिकारी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था प्रादेशिक केंद्र, नवी मुंबई, डॉ वसीम अहमद संस्थेचे सहायक प्राध्यापक आणि सुश्री शर्मिष्ठा घोष वरिष्ठ विशेष शिक्षिका हे होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थी, पालक, शिक्षक प्रशिक्षणार्थी आणि संस्थेच्या शिक्षकांनी सामूहिक गायन, समूह नृत्य, वाद्य वादन यासह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. सुश्री. श्री संजय चौहान यांनी संस्थेकडून बौद्धिक दिव्यांगजन व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने होत असलेल्या कार्याचे कौतुक केले.  

डॉ. रवि प्रकाश सिंह यांनी सांगितले की, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) प्रादेशिक केंद्र नवी मुंबई  यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगून देशाच्या प्रगतिमध्ये दिव्यांगाचे स्थान किती महत्वाचे आहे हे सर्वांना समजावून सांगितले. 

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ वसीम अहमद सरांनी केले.

संपुर्ण कार्यक्रमाचे समन्वयन सुश्री शर्मिष्ठा घोष वरिष्ठ विशेष शिक्षिका आणि सुश्री ज्योती खरात, व्याख्याता विशेष शिक्षण राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, (दिव्यांगजन) प्रादेशिक केंद्र नवी मुंबई यांनी केले.

Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image