श्री साई गणेश मंदीर ट्रस्ट खारघर येथे माघी गणेशोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

श्री साई गणेश मंदीर ट्रस्ट खारघर येथे माघी गणेशोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन


खारघर(प्रतिनिधी)दि२४-खारघरमध्ये वास्तुविहारस्थित सेक्टर-१६ येथील श्री साई गणेश मंदीर ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज दि.२४ आणि २५ असे दोन दीवस येथे भव्य असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यामध्ये दिंडी प्रदक्षिणा,गणेश मुर्ती पुजा,अभिषेक,भजन संध्या,महाआरती,महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आपणांस पहायला मीळणार आहे.बुधवारी २५ तारखेला महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

     या ट्रस्टच्या कार्यक्रमात वास्तुविहार व सेलिब्रेशन मधील नागरिकांसह खारघरमधील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार होतात.

     ट्रस्टचे संस्थापक समीर कदम यांनी जनसभाच्या माध्यमांतून परिसरातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे की,आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image