उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची निवड

उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांची निवड


अलिबाग,दि.23(जिमाका):-मागील वर्षभरात राज्यामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत निवड केलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांचा समावेश आहे. श्री.मुंडके यांची 188-पनवेल या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयासाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

       राज्यस्तरावर सन्मानासाठी/ पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते दि. 25 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पाटकर सभागृह, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात येणार आहे.

      विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे आणि इतर सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही निवड झाली असल्याचे सांगून पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image