ठाणा नाक्यावरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

 ठाणा नाक्यावरील पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ

----------------- ----------------- ----------------- ----------------- -----------------
नारळ फोडून कुणा भामट्यांना श्रेय घ्यायचे असेल तर घ्यावे : कांतीलाल कडू




---------------------- ----------------- ----------------- ----------------- -----------------
पनवेल: सीएसटी- पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गावरील पनवेल ठाणा नाका जवळील पुलावर दुरुस्तीच्या कामाला अखेर आयआरबी टोल प्लाझा कंपनीला मुहूर्त मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीकडे धोशा लावला होता. अनेक अडचणी पार करून आज अखेर कामाला प्रत्यक्षात कोणताही गाजावाजा न करता, किंवा नासके नारळ न फोडता प्रारंभ केला.

आयआरबीचे विभागीय अभियंता सचिन देवरे यांनी कडू यांच्या पाठपुराव्यानंतर दोन वेळा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची परवानगी घेतली. हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर पनवेल वाहतूक शाखेची परवानगी घेतली. पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे, पनवेल वाहतूकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे यांनी वाहतूकीत काही किरकोळ फेरबदल केल्याने एका मार्गीकेचे काम सुरु केले आहे. त्यानंतर दुसऱ्या मार्गीकेचे काम करण्यात येईल. वाहतुकीचा अंदाज घेवून हे काम दीर्घ मुदतीत म्हणजे दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.
या कामामुळे अपघाताचा शून्य प्रमाणात आलेख रोडावण्याची शक्यता वर्तवली आहे.

नासके हात आणि नासके नारळ
यामुळे पनवेलचा विकास रखडला!
-------------------
पनवेल शहर अथवा आजूबाजूला कुणीही सामाजिक कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला किंवा कुणी ठेका घेतला की, तिथे काही नासके हात सरसावतात. मग नासके नारळ फोडण्याचा इव्हेंट घडवून आणतात. पुढे ते काम होवो अथवा प्रलंबित राहो, याकडे लक्ष दिले जात नाही. फक्त श्रेय लाटणारी ही विकृती पनवेलच्या विकासात बाधा आणत आहेत आणि स्वतःच्या चुका जनतेच्या माथी मारल्या जात आहेत.
पनवेलची जनता सुज्ञ असल्याने त्यांची फसवणूक कशी केली जाते, काम कोण करतो, श्रेय कोण घेतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. शिवाय नवीन पनवेलच्या पुलाचे काम सिडकोकडून कुणी मंजूर केले आणि नारळ फोडून श्रेय कुणी लाटले, काम का रखडले यावर जनता नजर रोखून आहे. योग्य वेळी ती त्यांना जागा दाखवून देईल.
- कांतीलाल कडू
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image