रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली उरण शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना वाहिली आदरांजली

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली उरण शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना  वाहिली आदरांजली 





उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
दिनांक 16 जानेवारी व 17 जानेवारी 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली उरण शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना अभिवादन करताना रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आदरांजली वाहिली.भूमीपुत्रांचा जमीन हक्क लढा ज्यातून 12.5% योजनेचा जन्म झाला, ज्या आंदोलनाने जमिनीच्या बदल्यात जमीन हे तत्व प्रस्थापित केले, ज्यामुळे आज नवी मुंबई, उरण पनवेल येथील भूमिपुत्र सुखाचे दोन घास खात आहे,आणि ज्या तत्वाचा फायदा आज संपूर्ण भारत देश घेतो, त्या आंदोलनातील हुतात्म्यांना व शेकडो लोक पोलिसांच्या गोळीबारात व लाठी  हल्यात जखमी झालेत त्या सर्व शुरविरांना महेंद्र घरत यांनी विनम्र अभिवादन केले.दिनांक 16 जानेवारी 1984  रोजी जासई येथील पोलीस गोळीबारात हुतात्मा नामदेव शंकर घरत,  हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर.या दोन शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर दिनांक 17 जानेवारी रोजी नवघर येथे पागोटे गावातील हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमलाकर कृष्णा तांडेल, हुतात्मा महादेव हिरा पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अश्या या शूरवीरांनी 1984 च्या जमीन हक्क लढ्यात 16 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजी हुतात्मे झाले त्यांना त्यांच्या बलिदान दिना निमित्त चिर्ले, धुतुम, जासई,पागोटे आदी ठिकाणी जाऊन महेंद्र घरत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image