‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ- आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

 ‘रयत’साठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सातत्याने पाठबळ-  आमदार दिलीप-वळसे पाटील यांचे गौरवोद्गार




पनवेल (प्रतिनिधी )रयत शिक्षण संस्थेच्या बाबतीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे सहकार्य करण्यासाठी कधीही मागे राहत नाहीत. सतत त्यांचा हात वाढताच असतो, असे गौरवोद्गार राज्याचे माजी गृहमंत्री तथा ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी कामोठे येथे काढले.
        रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८२ वा वाढदिवस आहे. दुग्धशर्करा योग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सभासदत्व अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्त झाल्यास यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कृतज्ञता सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रायगड विभाग कामोठे पनवेलच्या वतीने ४० हजार स्क्वेअर फुटी महारांगोळी तसेच खुल्या गटातील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप-वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
  या उपक्रमास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे रायगड विभागीय चेअरमन आमदार बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, नावडे आयटीआयचे चेअरमन बाळाराम खुटारकर, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन एकनाथ पाटील, ‘रयत’चे रायगड विभाग सहाय्यक अधिकारी एस. एस. फडतरे, रायगड विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.  
      रयत शिक्षण संस्थेच्या विकासात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे योगदान खूप मोठे व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस प्रत्येक शाखेत विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रायगड विभागातील संस्थेचे पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, प्राचार्य, मुख्याध्यापक, शाळांचे चेअरमन व स्कूल कमिटी जेष्ठ सदस्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्या बैठकीत दिनांक ०६ ते १२ डिसेंबर पर्यंत रायगड विभागीय स्तरावरील 'कृतज्ञता सप्ताह' आयोजित करण्याचे एकमताने ठरले होते. त्यानुसार रायगड विभागीय स्तरावरील 'कृतज्ञता सप्ताह' मध्ये वक्तृत्त्वस्पर्धा, निबंधस्पर्धा, चित्रकला, पोस्टर्स स्पर्धा, रांगोळीस्पर्धा, क्रीडास्पर्धा, महारांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हाफ मॅरेथॉन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने हि महारांगोळी साकारण्यात आली आहे. 
         
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image