प्राच्यविद्या संशोधनला साडेसात कोटी अनुदान

 प्राच्यविद्या संशोधनला साडेसात कोटी अनुदान 


पनवेल(प्रतिनिधी) मूर्ती ट्रस्ट या सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या कौटुंबिक प्रतिष्ठानने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे जतन आणि संशोधन करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलीया अनुदानामध्ये १८,००० चौरस फूट हेरिटेज शैलीची, २०० आसनक्षमता असलेली शैक्षणिक आणि संशोधन इमारतव्याख्याने आयोजित करण्यासाठी एक अत्याधुनिक सभागृह आणि प्राचीन पुस्तके आणि हस्तलिखिते डिजीटाईज करण्यासाठी दृकश्राव्य स्टुडिओ असलेल्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीजचे बांधकाम समाविष्ट आहेसुधा मूर्ती यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन पुणे येथे करण्यात आले.

          नवीन उपक्रमाबद्दल बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही १०५वर्षे जुनी संस्था आहे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहेया संस्थेने बौद्धिक शोधनिबंध आणि पुस्तकांची भरपूर निर्मिती केली आहेभांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील प्रत्येक प्राध्यापक महान विद्वान आहेत'महाभारताची चिकित्सा आवृत्तीआणि 'काणे यांचे धर्मशास्त्रया दोन पुस्तकांच्या बौद्धिक कार्याने मी भारावून गेले. ही दोन्ही पुस्तके माझ्या मनाला खूप भावली आहेतकाळ बदलला तसे आता लोकांना आपल्या संस्कृती बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ऑनलाइन वर्ग हवे आहेतया क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधायची इच्छा आहे. म्हणूनच मूर्ती ट्रस्टने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करण्यासाठी समर्पित असलेली एक नवीन आणि आधुनिक इमारत बांधून देण्याचे ठरवले आहे."

               भांडारकरप्राच्यविद्यासंशोधनसंस्थेच्या कार्यकारीमंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी देखील संस्थेच्या मूर्ती सेंटर ऑफ इंडिकस्टडीजच्या योजनांबद्दल सांगितलेसुधाताई यांनी शैक्षणिक प्रकल्पांसाठी निधी दिला आहे आणि आता संस्थेकडे भारतीयतत्त्व ज्ञान ते कथ्थक आणि आयुर्वेदापासून खगोलशास्त्रापर्यंत विविध विषयांवर काम करणारे अंदाजे ४० विद्वान आहेतआगामी मूर्ती सेंटर ऑफ इंडिकस्टडीज ६० हून अधिक विद्वानांना सामावून घेऊ शकतेत्याचवेळी या संशोधन संस्थेने आता शिक्षण कार्यातही प्रवेश केला आहेत्यामुळेवर्गखोल्यांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी २०० विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल आणि या मूर्तीसेंटरमध्ये स्टुडिओ असल्याने आम्ही चांगला ऑनलाइन आशय तयार करू शकू आणि तो 'भारतविद्या' या आमच्या प्लॅटफॉर्मवर सादर केला जाईल. संस्थेकडे २८,००० हस्तलिखिते आणि जुनी पुस्तके आहेतही पुस्तके जतन करण्यासाठी नवीन इमारतीत एक संवर्धन प्रयोगशाळा असणार आहे. संस्थेसाठी आणि तिच्या भविष्यासाठीही एक मोठी झेप ठरणार आहेया सुविधेमुळे भारतीय संस्कृतीतील् विविध विषयांचा प्रसार जगभर केला जाऊ शकतोत्यामुळे आम्ही मूर्तीट्रस्टचे अत्यंत ऋणी आहोत,असेही त्यांनी म्हंटले.