*महापरिनिर्वाणदिनानमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन*
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. श्रीराम पवार, श्री. सोमनाथ पोटरे, श्री. योगेश कडुसकर, श्रीम. मंगला माळवे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे, श्री. मदन वाघचौडे, श्री. सुनिल लाड, श्री. संजय भय्यासाहेब पाटील, श्री. संजय दादा पाटील, श्री. विजय राऊत, श्री. मनोहर सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.