लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवकरच्या शिलेदारांचे केले अभिनंदन
शिवकर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी शेकापच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला. नवनिर्वाचित सरपंच आनंद ढवळे आणि सदस्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची बुधवारी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनेश ढवळे व कार्यकर्ते उपस्थित होते.