घारापुरी (एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडकला;शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध

घारापुरी (एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडकला;शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध





शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व  विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.


उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यात अठरा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, गेले चार दिवस उरण तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायत निवडणूकी साठी सरपंच व सदस्य साठी शिवसेना व्यतिरिक्त कोणीही अर्ज सादर न केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा भगवा झेंडा घारापुरी ग्रामपंचायत  फडकला आहे. यामध्ये सरपंच पदी मिना मुकेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य पदी  बळीराम पदमाकर ठाकूर,हेमाली रुपेश म्हात्रे, अरुणा कमलाकर घरत, भरत शंकर पाटील नीता दिनेश ठाकूर, भारती प्रमोद पांचाळ, सचिन मुकुंद लाड हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.सर्व  विजयी शिलेदारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर  यांची सदिच्छा भेट घेतली, यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विजयाचे शिल्पकार माजी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच व शाखाप्रमुख  सचिन म्हात्रे नवनिर्वाचित सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच एक चांगली विजयी सुरुवात करून दिल्याबद्दल सर्वानी धन्यवाद दिले आहेत.
 
यावेळी उपजिल्हाप्रमुखश्री नरेश राहळकर, माजी सभापती  विश्वास म्हात्रे, उरण शहरप्रमुख महेंद्र पाटील,उपतालुकाप्रमुख  कमलाकर पाटील, उपविभागप्रमुख रवी पाटील, घारापुरीचे उपसरपंच व शाखाप्रमुख  सचिन म्हात्रे, नवीन शेवा शाखाप्रमुख  शैलेश भोईर, घारापुरीचे कार्यकर्ते विजय पांचाळ,श्रीधर घरत,संदीप पाटील,अशोक पाटील,मुकेश भोईर,सोमेश्वर भोईर,समीर भोईर,रुपेश म्हात्रे,लवेश भोईर,मंगेश आवटे, रोशन ठाकूर,महिला आघाडी नमिता घरत,रुपाली म्हात्रे,पल्लवी भोईर, कविता भोईर व शिवसैनिक उपस्थित होते.
Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image