गुजराथ मॉडेल अक्षरशः फेल ठरले आहे - भाई आर सी घरत

गुजराथ मॉडेल अक्षरशः फेल ठरले आहे

- भाई आर सी घरत


गुजरात मध्ये काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर सी घरत यांनी केला जिग्नेश मेवाणी यांचा प्रचार

अहमदाबाद (प्रतिनिधी)- गुजराथ मध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला असून दुसरा टप्प्यात मतदान झाल्यानंतर आठ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. गुजरात मध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान सदस्य आय आर सी घरत यांची प्रचारक म्हणून निवड झाली आहे.राष्ट्रीय दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्या प्रचाराची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भाई आरसी घरात यांच्या मजबूत खांद्यावर सोपविली आहे. ते वडगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आर सी घरत यांनी मतदारसंघातील प्रचाराच्या यंत्रणेचा आढावा घेतला, कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या, गावोगावी झालेल्या बैठकांच्यात सहभागी होऊन त्यांनी मेवाणी यांचा प्रचार केला.

       गुजरात मधील प्रचारा दरम्यान आलेले अनुभव प्रसिद्धी माध्यमांसमोर विशद करताना आर सी घरत म्हणाले की. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरात मॉडेलचा गवगवा करत देशभरातील नागरिकांना मूर्ख बनवले मुळात ते गुजरात मॉडेल हे अक्षरशः फेल ठरले आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी मोजकी शहर सोडली तर ग्रामीण विभागातील रस्ते अक्षरशः कच्च्या रस्त्यांसारखे आहेत. नागरिकांचे रोजगार बुडाले आहेत, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या प्रचंड आहे, सुविधांच्या नावाखाली सगळा बट्ट्याबोळ सुरू आहे. शैक्षणिक सुविधांची वानवा आहे, पदवीधरांचा टक्का घसरतो आहे. भावनिक राजकारण करून किंवा संवेदनशील मुद्द्यावरती तेढ निर्माण करून प्राप्त केलेली सत्ता ही चिरकाल टिकत नाही. या गुजरात विधानसभा निवडणुकांच्यात भारतीय जनता पार्टीला फेल झालेल्या गुजरात मॉडेलचा फटका निश्चितच बसेल

     यावेळी आर सी घरत यांच्यासोबत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्ष प्रवक्ते तथा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड सर,पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष  ऍड अरूण कुंभार, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजीव चौधरी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मेहमूद भाई इत्यादी कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी झाले होते.