पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई-कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई-कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त


अलिबाग,दि.02 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव याच्या नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द काल दि.1 डिसेंबर 2022 रोजी धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 मोठया बार्ज, 4 मध्यम बार्ज व 2  छोटया संक्शन पंपच्या बोटी अशा 10 बोटीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

         खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात 6 बार्ज देण्यात आल्या असून  संबधितांवर 41 डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 2 बोटी एन.आर.आय. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून संबधितांविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 बोट गाळामध्ये फसली असल्याने ती बोट जागेवरच नष्ट करण्यात आली व 1 बोट एन.आर.आय. ताब्यात घेतली असून त्याबाबतची पुढील कार्यवाही चालू आहे. तसेच 5 संक्शन पंपही नष्ट करण्यात आले.  या कारवाई अंतर्गत कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त करुन संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘दैनिक किल्ले रायगड’च्या ५९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
Image
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image