राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन



उरण दि १०- राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदीवसानिमित्ताने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनानुसार पेण तालुका काँग्रेस कमिटी व वाशी विभाग काँग्रेस कमिटी यांच्या विद्यमाने  नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटपाचे आयोजन ९ डिसेंबर रोजी बोर्झे - पेण येथे करण्यात आले होते. या शिबिराचा २५० ग्रामस्थांनी लाभ घेतला तर २०० मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
हे शिबिर महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल कामोठे व ग्रामस्थ मंडळ बॉर्झे यांच्या सहकार्याने तसेच पेण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक मोकल, रायगड जिल्हा चिटणीस आर. जे. म्हात्रे, वाशी विभाग काँग्रेस अध्यक्ष वैभव म्हात्रे, पेण तालुका उपाध्यक्ष  धीरज म्हात्रे यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी पार पडले.
या शिबिरासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या उपाध्यक्षा पल्लवी रेणके, पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष  वैभव पाटील, रायगड जिल्हा चिटणीस मुरलीधर ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, पेण तालुका युवक अध्यक्ष रोहित म्हात्रे, बॉर्झे ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी ठाकूर,उपसरपंच विजय ठाकूर,ग्रामसेविका सविता चांदोरकर,दिवगावचे सरपंच विवेक म्हात्रे तसेच बोर्झे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोर्झे गावात जिर्णोद्धार होत असलेल्या शंकर मंदिरासाठी  महेंद्रशेठ घरत यांनी २५,०००/- रुपयांची देणगी दिली आहे.
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image