रविवारी 'रामबाग'मध्ये 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'

 रविवारी 'रामबाग'मध्ये 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  


पनवेल(प्रतिनिधी) दुबईच्या धर्तीवर न्हावे खाडी येथे उभारण्यात आलेल्या 'रामबाग' मध्ये नवीन वर्षनिमित्त 'लाईव्ह म्युझिकल इव्हेंट'  या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे रविवार दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६. ३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.  

          माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी अशी 'स्वर्गसुख आनंद देणारी रामबाग' साकारली आहे. १४ एकर जागेतील या 'रामबाग' उद्यानात भव्य आणि सुरेख प्रवेशद्वार, निसर्गरम्य हिरवळीसह विविध प्रकारच्या फुलझाडांच्या असंख्य विविध रचना, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन सेल्फी पॉंईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी आकर्षक आणि मनमोहक या ठिकाणी आहेत.  सायकांळी या उद्यानाचे रूप बदलते, त्यावेळी असणारी विद्युत रोषणाई अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटणारी आहे. आणि हा संगीत कार्यक्रम सांयकाळी असल्याने या कार्यक्रमाचा रसिकांना मनमुराद आनंद घेता येणार आहे. हा कार्यक्रम निशुल्क असून अधिक माहितीसाठी अभिषेक पटवर्धन ९०२९५८०३४३ किंवा गणेश जगताप ९८७०११६९६४ संपर्क साधावा. 

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image