'उमेद'अभियानातून ग्रामीण महीलाचे सक्षमीकरणाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी सरकार प्रयत्नशील-ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

'उमेद'अभियानातून ग्रामीण महीलाचे सक्षमीकरणाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी सरकार प्रयत्नशील-ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


 *राज्यातील ३८ हजार गावांमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.* 



मुंबई दि.३०

    'उमेद' अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील  महीला चे सक्षमीकरणा बरोबरच ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले ते आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात 'उमेद' महिला सक्षमीकरण विशेष कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते.

ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी गरिब, विधवा, निराधार,यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत यावेळी महाजन यांनी व्यक्त केले.

राज्यातील महिला बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्यवस्थापन पॅकिंग तसेच मार्केटिंग करण्यावर भर देण्यात यावा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शहरालगत मोठ्या माॅल ची  उभारूनी करून महीला बचत गटाच्या वतीने उत्पादीत मालाची विक्री करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे ही यावेळी श्री.महाजन म्हणाले .

    राज्यातील  जवळपास ३८ हजार गावांमधील ५५ लाख कुटुंबे या अभियानात सहभागी झाले आहेत. माध्यमातून ५ लक्ष ८४ हजार स्वयं सहाय्यता गटांची निर्मिती झाली असून १० हजार उत्पादन गट तयार करण्यात आले असून ४५ शेतकरी उत्पादक गट तयार करण्यात आले असून  जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून तसेच अभियाना अंतर्गत ११ कोटी रुपयांचा निधीचे वाटप स्वयं सहाय्यता गटांना करण्यात आले असून येणाऱ्या काळामध्ये या मध्ये भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अत्यंत देखण्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सल्लागार राजेश कुलकर्णी आणि उमेद टीमचे कौतुक केले.

ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याच्या ग्रामीण आर्थिक विकासात उमेद अभियान महत्वाची भूमिका निभावत असून अभियानातील सहभागी कुटुंबाचे किमान १ लाख वार्षिक उत्पन्न करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी मानले.

या कार्यक्रमाला सायन कोळीवाडा मतदार संघाचे आमदार कप्तान आर ,तमिल सेल्वन अप्पर मुख्य सचिव श्री.राजेश कुमार, विभागाचे श्री.राजेश कुलकर्णी तसेच  संबंधित विभागाचे अधिकारी, मोठ्या संख्येने राज्यातील महिला बचतगटाच्या प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती  उपस्थित होत्या.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image