पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून  उमेदवारी अर्ज दाखल


पनवेल दि.०१ (वार्ताहर): पनवेल तालुक्याच्या १० ग्रामपंचायतीच्या निवडणूका  येत्या १८ डिसेंबर रोजी पार पडत असून त्या निवडणुकीसाठी आज शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)  यांच्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे दाखल केले.  

            तालुक्यातील नितलस मध्ये 4, करंजाडे 2, दिघाटी 1, शिरढोण 5, चिंध्रण 2, कानपोली  2, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शन वं सहकाऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, महाविकास आघाडीचे मा विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, मा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदाम पाटील, काँग्रेस पक्षाचे ए.  एस.  पाटील,   हेमराज म्हात्रे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रचंड उत्साहात व शक्ती प्रदर्शन करीत शिवसेना उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Popular posts
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा;फलटणच्या रंजीत जाधवचा सायकल प्रवास :
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात;केंद्र सरकारची भूमीका होणार स्पष्ट.
Image
भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमधे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत उभा राहील - शिवसेना उपनेते बबनदादा पाटील
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न;श्री.प्रितमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
Image