अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने सत्कार संपन्न

अर्जून पुरस्कारप्राप्त नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या वतीने सत्कार संपन्न


अलिबाग, दि.17 (जिमाका):-जिल्ह्यातील अर्जून पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध नेमबाज क्रीडा मार्गदर्शक सुमा सिद्धार्थ शिरूर यांना केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार “द्रोणाचार्य पुरस्कार” जाहीर झाल्यामुळे त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी रायगड तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने पनवेल येथील लक्ष शूटिंग क्लब येथे पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले.

     याप्रसंगी माणगाव तालुका क्रीडा अधिकारी श्री.राजेंद्र अतनूर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनिषा मानकर, पनवेल महानगरपालिका क्रीडा समन्वयक श्री.समीर रेवाळे आदी उपस्थित होते.



Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image