रायगड जिल्हा परिषद शाळा,धामोळे येथे राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

 रायगड जिल्हा परिषद शाळा,धामोळे येथे राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

 


खारघर, ता. 11 नव्हेंबर 2022

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधन प्रेक्षाध्यान व जीवनविज्ञान तथा श्री जैन श्वेतांबर तेरापंथ महिला मंडल खारघर-बेलापूर शाखेच्या वतीने दि. 11 नव्हेंबर रोजी धामोळे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत *राष्ट्रीय शिक्षण दिवस* साजरा करण्यात आला. 

     भाजपा खारघर-तळोजे मंडल उपाध्यक्षा बीना गोगरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उपरोक्त संस्थांतर्फे रा.जि.प. शाळेला फळे, वह्या, चित्रकला वह्या इत्यादि शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. 

      विद्यार्थ्यांनी प्रार्थना व गाणी म्हणून, त्याचप्रमाणे शाळेतील त्यांचे अनुभव सांगून पाहुण्यांसोबत हितगुज केले. 

या वेळी बेलापूर तेरापंथी महिला मंडळच्या संयोजिका मंजु संचेती, प्रेक्षाध्यान प्रशिक्षिका मालती जैन व सुमिता दिवेकर, खारघर तेरापंथ महिला मंडळच्या माजी संयोजिका रेखा जैन उपस्थित होत्या.

      शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र पाटील सरांनी पाहुण्याचे आभार मानले.

Popular posts
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image